बुद्धगया येथे माजी आमदार डॉ. अविनाश वारजूकर यांचे उपासक व उपासिकांना मार्गदर्शन
देशातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची कार्यक्रमाला महाबोधी महाविहारत उपस्थिती
बुद्धगया ( बिहार, 6 मे ) : महाबोधी महाविहार, बोधीवृक्ष परिसर बोधगया विहार यांच्या संयुक्त विद्यमाने महाबोधी चॅरिटेबल ट्रस्ट, डॉ.आंबेडकर इंटरनॅशनल बुद्धिस्ट संसद, इंटरनॅशनल बुद्धिस्ट नेटवर्क द्वारा संचालित २५६७ वी त्रीपावन बुद्ध जयंती निमित्त ‘ १००० भिक्षुना भव्य संघदान ‘ या कार्यक्रमाच्या निमित्याने बुद्धगया येथे माजी आमदार, माजी मंत्री महाराष्ट्र खनिकर्म महामंडळ तथा महासचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी डॉ.अविनाश वारजुकर यांनी उपस्थित बौद्ध उपासक, उपासिका यांना मार्गदर्शन केले.याप्रसंगी भिक्खू संघ उपस्थित होता.
याशिवाय मंचावर उपस्थित भूतपूर्व मुख्यमंत्री बिहार प्रदेश गया जितनराम मांझी, भूतपूर्व रजिस्ट्रार कुलसचिव नागपूर विद्यापीठ प्रा. डॉ.पुरणचंद्र मेश्राम, राष्ट्रीय अध्यक्ष भारत मुक्ती मोर्चा वामन मेश्राम, डॉ.आर. बी.एस. पुष्कर, डॉ. अरविंद सिंह, प्रा. डॉ. युवराज मेश्राम, डॉ.जी. एस. गौतम, श्यौराज सिंह , भैय्याजी खैरकर,बोधगया राष्ट्रीय अध्यक्ष भदंन्त हर्षबोधी महास्थवीर व अनेक मान्यवर उपस्थित होते.