शिक्षक संघाच्या वतीने उत्कृष्ट शिक्षक गौरव पुरस्कार व नवनियुक्त शिक्षक सत्कार समारंभाचे आयोजन
गोंदिया (१७ सप्टेंबर ): सन 1999 पासून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ तालुका गोंदियाच्या वतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील उत्कृष्ठ शिक्षकांना पुरस्कृत करण्यात येत आहे. हीच परंपरा जपत यावर्षी सुद्धा दिनांक 13/09/2024 शुक्रवारला प्रत्येक केंद्रातील तीन उत्कृष्ट शिक्षक अशा एकूण 39 शिक्षकांना संघटनेच्या वतीने पुरस्कृत करण्यात आले. तसेच पवित्र पोर्टल व्दारे भरती झालेले तालुक्यातील 16 नवनियुक्त शिक्षकांना सुद्धा भेटवस्तू व मोंमेंटो देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविकात तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष मोरेश्वर बडवाईक यांनी कार्यक्रमाची उद्दीष्ठ, विद्यार्थी -शिक्षक व समाज यासाठी सामाजिक बांधिलकी जपत चालू असलेले शिक्षक संघाचे कार्य तसेच विद्यार्थी -शिक्षकांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत कथन केले. योपेंद्रसिंह (संजय) टेंभरे सभापती अर्थ व बांधकाम जि.प.गोंदिया यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाची हमी दिली व संघटनेच्या कार्याविषयी संघटनेचे कौतुक केले. समारंभाच्या उद्घाटीका पुजा अखिलेश सेठ सभापती महिला व बालकल्याण जि.प.गोंदिया यांनी महिला सक्षमीकरण व विद्यार्थीनी सुरक्षितता यावर उपाय योजना आवश्यक असून जि.प.गोंदियाच्या सभेत शिक्षकांच्या समस्या मांडण्याची हमी दिली. शिक्षक नेते विरेंद्र कटरे यांनी आपल्या भाषणात संघटनेचे व शिक्षक एकतेचे महत्त्व समजावून शिक्षकांना संघटनेशी जुळून राहण्यासाठी आवाहन केले.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून शिक्षक महासंघाचे संघटक नुतन बांगरे, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे विभागीय अध्यक्ष केदारनाथ गोटेफोडे, जिल्हाध्यक्ष किशोर बावनकर, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष यशोधरा सोनवाने, राज्य उपाध्यक्ष अयुब खान, राज्य कार्यकारिणी सदस्य उमाशंकर पारधी, अनिरुद्ध मेश्राम, जिल्हा सरचिटणीस अरविंद उके, महिला आघाडी जिल्हा सरचिटणीस यशवंती लिखार, शाखाध्यक्ष चंद्रशेखर दमाहे, संचालिका नितू डहाट, संचालक विनोद चौधरी, प्रकाश ब्राह्मणकर, अनमोल मेश्राम, कार्याध्यक्ष हेमंत पटले, कोषाध्यक्ष राजेंद्र निंबार्ते, संयोजक गणेश चुटे, प्रसिद्धी प्रमुख विनोद लिचडे, प्रवक्ता लिकेशसिंह हिरापुरे, कार्या.सरचिटणीस सुनील सोनवाने, जुनी पेन्शन संघटना अध्यक्ष सचिन धोपेकर हे होते.
तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ तालुका संघांचे अध्यक्ष मोरेश्वर बडवाईक, सरचिटणीस चंदू दुर्गे, नेते योगानंद पटले, कार्याध्यक्ष मनिष बलभद्रे, कोषाध्यक्ष तेजकुमार बिसेन, महिला आघाडी अध्यक्षा पल्लवी नंदनवार, सरचिटणीस मंजूताई उके, महिला प्रमुख निर्मला नेवारे, रेखा चौधरी, संयोजक आर.जी.सार्वे, प्रसिद्धी प्रमुख विजय लिल्हारे, सचिन वडीचार, संपर्क प्रमुख नंदकिशोर चित्रीव, राकेश प्रधान, कार्या.चिटणीस ओमप्रकाश पटले, मुक्तानंद फड, संघटक डी.सी.रहांगडाले, हर्ष पवार, सहचिटणीस संतोष टेंभरे, दत्तात्रय बागडे, जि.कार्यकारणी सदस्य देव जतपेले, एस.पी.कुंभलकर, मनिष राठोड, अरुण कटरे, डी.एस. कोल्हे, वाय.बी.चावके, आर.एच.राऊत, बी.वाय.फुले, प्रविण नरुले, केशवराव मानकर, के.एल. कावळे, माणिकलाल घाटघुमर, एन.बी.सोनकल्यारी, विलास धकाते, शैलेश गौतम, फिरोज पठाण, सतिश राऊत, महेंद्र कस्तुरे, सुनील चौरागडे, महिला संघटीका रोमा गोंडाणे, स्नेहलश्री साठवणे, वर्षा श्रीभद्रे, अनिता फब्यानी, नरुले मॅडम यांनी प्रयत्न केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सचिन वडीचार यांनी तर आभारप्रदर्शन चंदू दुर्गे यांनी केले. कार्यक्रमास शिक्षक संघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शिक्षक -शिक्षिका बहुसंख्येने उपस्थित होते.