पुर्नरचनात्मक शस्त्रक्रिया शिबिरात 9 रुग्णांवर शस्त्रक्रिया
♦ रुग्णांच्या बँक खात्यावर जमा होणार 12 हजार रुपये
नागपूर,दि. 13 : राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम व सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) यांचे वतीने नुकताच एन. के. पी. साळवे वैद्यकीय महाविद्यालय तथा लता मंगेशकर हॉस्पीटल नागपूर येथे विकृती असलेल्या कुष्ठरुग्णांकरीता पुर्नरचनात्मक शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिरात जिल्ह्यातील 12 विकृती असलेल्या रुग्णांना भरती करण्यात आले. 23 ऑगस्ट रोजी 9 रुग्णांवर विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. उर्वरित 3 रुग्णांवर पुढील कालावधीत त्यांच्या वैद्यकीय अहवालानुसार शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. शासनाने ठरवून दिलेल्या 12 उद्दिष्टांपैकी 12 पुर्नरचनात्मक शस्त्रक्रिया होणार आहे. या रुग्णांवर शस्त्रक्रिया झाल्यावर शासनातर्फे 12 हजार रुपये अनुदान रुग्णांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे.
या शिबिराचे उद्घाटन डॉ. सजल मित्रा, अधिष्ठाता एन. के. पी. साळवे वैद्यकीय महाविद्यालय तथा लता मंगेशकर हॉस्पीटल नागपूर यांच्या हस्ते करण्यात आले. शस्त्रक्रिया नागपूरचे प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ. अनिल गोल्हर, एन. के. पी. साळवे वैद्यकिय महाविद्यालय तथा लता मंगेशकर हॉस्पीटलचे विभाग प्रमुख डॉ. सुशील मानकर, डॉ. सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) दीपिका साकोरे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रविण पडवे यांचे उपस्थितीत करण्यात आल्या. शिबीराच्या यशस्वीतेसाठी डॉ. शाजीया शम्स, डॉ. संजय पुल्लकवार डॉ. सिद्धीक अहेमद, व वैद्यकीय अधिकारी सुलू नागपूर जिल्हा कुष्ठरोग पर्यवेक्षक देविदास अवसरकर यांनी सहकार्य केले.