सामाजिक भान ठेवून शिक्षकांनी गुणवंत विद्यार्थी घडवावा- अध्यक्ष, उपाध्यक्ष जि.प. गोंदिया
■◆ मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुंगानंथम(IAS) यांच्या मार्गदर्शनात जिल्हा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार व गुणवंत विद्यार्थी गुणगौरव समारंभ थाटात संपन्न
गोंदिया, (दि. 7): शिक्षक दिनानिमित्त (5 सप्टेंबर) जिल्हा परिषद गोंदिया शिक्षण विभाग (प्राथमिक) च्या वतीने जिल्हा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार व गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ वसंतराव नाईक सभागृह जिल्हा परिषद गोंदिया येथे आयोजित करण्यात आला होता. शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल प्राथमिक विभागातून दिनेश उके, संदीप सोमवंशी , हिवराज रहांगडाले, सुरेंद्र मेंढे, खुमेशप्रसाद कटरे, सुरेंद्र भैसारे, कु. सुशीला भेलावे, माध्यमिक विभागातून इव्हेंद्र निनावे, प्राथमिक विभाग (विशेष शिक्षक) विभागातून कु. सरिता घोरमारे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष पंकज रहांगडाले, (जि. प. अध्यक्ष), यशवंतजी गणवीर (उपाध्यक्ष), मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम (IAS), जि.प. गोंदिया, जि.प. महिला व बालकल्याण सभापती सौ. सविताताई पूराम, समाज कल्याण सभापती सौ. पूजा अखिलेश सेठ, जिल्हा परिषद सदस्य सौ.कल्पनाताई वालोदे, सौ. अश्विनीताई रवी पटले, डॉ. लक्ष्मणजी भगत, लायकरामजी भेंडारकर, हनवंतजी वट्टटी, सुरेशजी हर्षे, छबुताई उके, अंबिकाताई बंजार (सभापती) प. स. देवरी, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सुधीर महामुनी, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) डॉ. महेंद्र गजभिये, प्राचार्य (डायट) डॉ.नरेश वैद्य, उपशिक्षणाधिकारी अशोक लांडे, ज्ञानेश्वर दिघोरे, शिक्षण विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी, गुणवंत विद्यार्थी, शिक्षक व पालक वर्ग मोठ्या संख्येने प्रामुख्याने उपस्थित होते.
प्रास्ताविक करतांना शिक्षणाधिकारी
यावेळी मार्गदर्शन करतांना जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले व उपाध्यक्ष यशवंत गणवीर यांनी आपल्या उद्बोधनात समाजात शिक्षणाचे महत्त्व सांगून शिक्षक हा नव समाज निर्मिती करणारा कारागीर असून सर्व शिक्षकांनी सामाजिक भान ठेवून गुणवंत विद्यार्थी घडवावे असे आवाहन केले. तर मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुंगानंथम यांनी शिक्षक हा एक जबाबदार घटक असून विद्यार्थी हे दैवत आहेत त्यामुळे त्यांना स्वतःच्या मुलांप्रमाणे वागणूक द्यावी व नेहमी विद्यार्थी गुणवत्तेचा ध्यास मनात ठेवून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी तयार करावे व विद्यार्थ्यांनी देखील शालेय अभ्यासासोबत विविध स्पर्धा परीक्षेची तयारी लहानपणापासूनच करावी व मोठे अधिकारी बनण्याचे स्वप्न बाळगावे असे मार्गदर्शन केले.
मार्गदर्शन करताना मुख्य कार्यकारी अधिकारी
मनोगत व्यक्त करतांना संदीप सोमवंशी
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षणाधिकारी सुधीर महामुनी तर आभार प्रदर्शन शिक्षणाधिकारी (माध्य.) डॉ. महेंद्र गजभिये यांनी केले. सूत्र संचालन शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती पौर्णिमा विश्वकर्मा यांनी केले. कार्यक्रमात शिक्षकांतर्फे संदीप सोमवंशी यांनी सत्काराला उत्तर म्हणून आपले मनोगत व्यक्त केले.
आभार व्यक्त करतांना शिक्षणाधिकारी(माध्य.)
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षण विस्तार अधिकारी नरेंद्र जी. डहाके, एल. डी. चौहान, अंबर बिसेन, समग्र शिक्षा सहायक कार्यक्रम अधिकारी दिलीप बघेले, समन्वयक बाळकृष्ण बिसेन, कुलदीपिका बोरकर, शिक्षक शाम कुंभलवार, घनश्याम कावळे, सौ. यशोधरा महेंद्र सोनेवाने यांनी सहकार्य केले.
शारदा स्तवन व स्वागत गीताने वेधले लक्ष
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खर्रा ता. गोंदिया येथील मुलींनी गायलेले सुंदर अशा शारदा स्तवन व स्वागत गीताने कार्यक्रमाला रंगत आणली. या सर्व मुलींचे मुख्य कार्यकारी अधिकारी व उपाध्यक्ष यशवंत गणवीर यांनी भेट देऊन अभिनंदन केले. यावेळी शिक्षक आर. सी. चौधरी व सहकारी यांनी संगीताची साथ दिली.
मनमोहक रांगोळीनेही उपस्थितांना घातली भुरळ
समग्र शिक्षा जिल्हा समन्वयक कु. कुलदीपिका बोरकर यांनी काढलेल्या शैक्षणिक रांगोळी पाहून उपस्थित पाहुणे व विद्यार्थी व शिक्षक हे मोहित झाले असल्याचे दिसून आले. सर्वांनी रांगोळी समवेत आपली फोटो काढून घेतली. सुंदर रांगोळी काढल्याबद्दल शिक्षण सभापती व उपाध्यक्ष यशवंत गणवीर व मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुंगानंथम यांनी बोरकर यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.