संदीप तिडके यांना शिक्षण मंत्री यांच्या हस्ते राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान
■◆ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार सोहळा संपन्न
गोंदिया, (दि.7): डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून संपूर्ण भारतात शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दिनांक 5 सप्टेंबर 2024 ला शासकीय थाटामाठात ,शाही समारंभात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य गुणगौरव आदर्श शिक्षक पुरस्कार कार्यक्रम राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला त्यात देवरी तालुका अंतर्गत जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक आदर्श शाळा सावली येथील होतकरू व उपक्रमशील शिक्षक संदीप तिडके यांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.
मागील 20 वर्षापासून संदीप तिडके हे शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांनी आपल्या कर्तबगारीच्या भरवष्यावर ज्या- ज्या शाळेत काम केले त्या सर्व शाळांना उंच शिखरावर शिक्षण क्षेत्रात पोहोचविण्याचे काम केले त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना यावर्षीचा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार घोषित करण्यात आला. 5 सप्टेंबर रोजी मुंबई येथील टाटा थीअटर्स नरिमन पॉईंट येथे संपन्न झालेल्या पुरस्कार सोहळ्यात जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक आदर्श शाळा सावली येथे कार्यरत संदीप तिडके यांना राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या शुभहस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,राज्याचे विधानसभा अध्यक्ष एड. राहुल नार्वेकर, आमदार ऍड. किरण सरनाईक, राज्याचे शिक्षण सचिव कुंदन मॅडम, (IAS)शिक्षण आयुक्त सुरज मांढरे, तसेच राज्य प्रकल्प संचालक आर. विमला मॅडम यांची कार्यक्रमाला उपस्थिती होती. संदीप तिडके यांच्या सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले, उपाध्यक्ष यशवंत गणवीर, महिला व बालकल्याण सभापती सविताताई पुराम, मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम, प्राचार्य डॉ. नरेश वैद्य, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) डॉ. महेंद्र गजभिये, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सुधीर महामुनी, उपशिक्षणाधिकारी अशोक लांडे, उपशिक्षणाधिकारी ज्ञानेश्वर दिघोरे, अधिव्याख्याता पूनम घुले, गटशिक्षणाधिकारी महेंद्र मोटघरे, शिक्षण विस्तार अधिकारी एस. जी. वाघमारे, हरपाल राऊत, जि.प. हायस्कूल चे शिक्षक दिपक कापसे, सावली शाळेतील शिक्षक वसंत नाईक , कु.वर्षा वालदे ,जोहनलाल मलगाम, शितल खाडे, वैशाली बडे, वैशाली सोनवाणे, वैशाली बिनझलेकर, मायाताई उईके, बीआरसी चे गट समन्वयक धनवंत कावळे, साधनव्यक्ती उमेश भरणे, विजय लोथे, डायट चे साधनव्यक्ती वशिष्ठ खोब्रागडे, यासह विविध क्षेत्रातील मित्रमंडळी, पत्रकार- राजकीय क्षेत्रातील मंडळी तसेच जिल्ह्यातील सर्व शिक्षक मित्रमंडळी यांनी अभिनंदन केले आहे.