दिनेश अंबादे यांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान…
गोरेगाव, (दि. 6 सप्टेंबर ): दि. 5 सप्टेंबर 2024 ला शासकीय थाटामाटात शाही समारंभात क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य गुणगौरव आदर्श शिक्षक पुरस्कार कार्यक्रम राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला. त्यात तालुक्यातील शहीद जान्या तिम्या जि. प. हायस्कुल गोरेगाव येथील उपक्रमशील शिक्षक दिनेश अंबादे यांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.
दिनेशकुमार अंबादे हे शहीद जान्या तिम्या जिल्हा परिषद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय गोरेगाव येथे सहाय्यक शिक्षक या पदावर कार्यरत असून यांना राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या शुभ हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. टाटा थिएटर्स नरिमन पॉईंट मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर, विधानसभा अध्यक्ष मा. अॅड. राहुल नार्वेकर, आमदार अॅड. किरण सरनाईक, राज्याचे शिक्षण सचिव कुंदन मॅडम (IAS) , शिक्षण आयुक्त सुरज मांढरे तसेच राज्य प्प्रकल्प संचालक आर. विमला मॅडम (IAS) यांची कार्यक्रमाला उपस्थिती होती.
दिनेशकुमार अंबादे यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान मिळाल्याबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुंगानंथम (IAS), डायट चे प्राचार्य डॉ. नरेश वैद्य, शिक्षणाधिकारी (माध्य.) डॉ. महेंद्र गजभिये, शिक्षणाधिकारी(प्राथ.) सुधीर महामुनी, डायट अधिव्याख्याता पूनम घुले, गटशिक्षणाधिकारी एम. डी. पारधी, केंद्रप्रमुख यु. एम. बोपचे, शाळेचे मुख्याध्यापक डॉ. प्रभाकर लोंढे, सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थी, विस्तार अधिकारी डी. टी. कावळे, BRC साधनव्यक्ती सुनील ठाकूर। सहकारी, डायटचे साधनव्यक्ती वशिष्ठ खोब्रागडे सह जिल्ह्यातील सर्व शिक्षक मित्रमंडळी यांनी अभिनंदन केले आहे.