जिल्हा शिक्षक पुरस्कार व गुणवंत विद्यार्थी सत्कार आज; जिल्ह्यातील 09 शिक्षकांचा उत्कृष्ट शिक्षक म्हणून होणार सत्कार….
■◆ जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी यांची उपस्थिती
गोंदिया, (दि.5): डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त (5 सप्टेंबर) शिक्षक दिन संपूर्ण देशभर साजरा केला जातो. या दिवशी विद्यार्थ्यांसाठी, समाजासाठी उत्कृष्ट योगदान देणाऱ्या शिक्षकांचा देखील आदर्श/ उत्कृष्ट शिक्षकांचा त्यांच्या कार्याची दखल घेऊन देशात, राज्यात व जिल्ह्यात गौरव केला जातो. त्याच अनुषंगाने यावर्षी गोंदिया जिल्हा शिक्षक पुरस्कार व गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ आज जिल्हा परिषद सभागृहात शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. यात जिल्ह्यातील 09 शिक्षकांची जिल्हा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असून त्यांचा यथोचित सन्मान शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात येणार आहे.
उत्कृष्ट जिल्हा शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याचे अध्यक्ष जिल्हा परिषद गोंदियाचे अध्यक्ष पंकज रहांगडाले असून उद्घाटक म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुंगानंथम उपस्थित राहणार आहेत. मुख्य अतिथी म्हणून इंजि. यशवंत सोपानदास गणवीर (उपाध्यक्ष तथा सभापती, शिक्षण, क्रीडा व आरोग्य समिती), प्रमुख अतिथी मध्ये जिल्हा परिषदेचे बांधकाम व अर्थ समिती सभापती योपेन्द्रसिंग युवराज टेंभरे, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती रूपेश रमेश कुथे, महिला व बालकल्याण समिती सभापती श्रीमती सविता संजय पुराम, समाज कल्याण समिती सभापती श्रीमती पूजा अखिलेश सेठ (धुर्वे) सह सर्व स्थायी समिती सदस्य व शिक्षण समिती सदस्य जिल्हा परिषद गोंदिया उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाला सर्वांनी वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथ.)सुधीर महामुनी, शिक्षणाधिकारी (माध्य.) डॉ. महेंद्र गजभिये यांनी केले आहे.
जिल्हा उत्कृष्ट शिक्षक म्हणून यांची झाली निवड