राजकीय

राज्यात ओबीसी बहुजन पार्टी लढणार विधानसभा – माजी आमदार प्रकाश अण्णा शेंडगे

■◆ ओबीसी मुख्यमंत्री, बहुजन सरकारची संकल्पना मांडण्यासाठी ओबीसी बहुजन पार्टी-  राष्ट्रीय अध्यक्ष माजी आमदार प्रकाश अण्णा शेंडगे यांची भूमिका

नागपूर, (दि.०१):- महाराष्ट्रामध्ये येत्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. त्यातच ओबीसीना हक्क आणि अधिकार मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नरत असलेले ओबीसी जन मोर्चा, ओबीसी बहुजन पार्टी, संयुक्त राष्ट्र मोर्चा भारत आणि सम विचारधारी संघटनांची  महत्त्वपूर्ण बैठक रवी भवन नागपूर येथे रविवारला पार पडली. या बैठकीत राज्यातील सरकारने ओबीसींचे ७२ वसतिगृह सुरु करण्याची घोषणा दोन वर्षापुर्वी केली, मात्रअद्यापही एकही वसतिगृह दोन वर्ष लोटूनही सुरु न झाल्याने सरकारच्या ओबीसी विद्यार्थी विरोधी भूमिकेचा निषेध नोंदवत ओबीसी विद्यार्थ्याकरींता वसतिगृहाची दारे उघडणाऱ्या अधिकाऱ्याला निलबिंत करुन महायुती सरकारने सरकार हे ओबीसी विरोधी असल्याचे सिध्द केल्याची टिका या बैठकित अनेकांनी व्यक्त  केली.

या ओबीसी विरोधी सरकारच्या विरोधात यावर्षी ओबीसी बहुजन पार्टी विधानसभा लढवेल, जिंकेल व ओबीसी मुख्यमंत्री बनवेल अशी घोषणा पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी आमदार प्रकाश अण्णा शेंडगे यांनी केली.

सदर बैठकीच्या अध्यक्षस्थानी ओबीसी जनमोर्चा व ओबीसी बहुजन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी आमदार प्रकाश अण्णा शेंडगे होते.  तर प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ.ज्ञानेश्वर गोरे,नागपूर विभाग अध्यक्ष प्रा.डॉ.एड रमेश पिसे,राष्ट्रिय सयुंक्त मोर्च्याचे राष्ट्रिय समन्वयक गोपाल ऋषीकर भारती, ओबीसी जनमोर्चा महिला आघाडी अध्यक्ष सुनिता काळे, ओबीसी जनमोर्चा प्रदेश उपाध्यक्ष डॉ.व्हि.डी.काळे, लोकजागर पक्षाचे अध्यक्ष प्रा. ज्ञानेश वाकुडकर मंचावर उपस्थित होते.

ओबीसी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर लेखी पत्र देत त्याची कल्पना संबधित विभागाला दिल्यानंतर नागपूरातील ओबीसीचे वसतिगृह ज्या अधिकाऱ्यांने ओबीसी विद्यार्थ्यांच्या हस्ते फित कापून तात्पुरते सुरू केले. ते इतर मागासवर्ग बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक राजेंद्र भुजाडे यांना काही लोकांंनी आपल्या स्वार्थाकरीता तक्रार करुन राजकीय कारणास्तव ओबीसी मंत्री अतुल सावे यांच्या माध्यमातून निलंबित केले. त्यांचे निलंबन तत्काळ रद्द करण्यात यावे अशी भूमिका ओबीसी युवा अधिकार मंचचे संयोजक उमेश कोराम व खेमेंद्र कटरे यांनी मांडली. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या सर्व जातींना जागृत करून सोबत अनुसूचित जाती अनुसूचित जमाती धार्मिक अल्पसंख्यांक समाजाच्या समाज बांधवांना सोबत घेऊन राजकीय आघाडी निर्माण करण्यात येईल अशी भूमिका ओबीसी बहुजन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी आमदार प्रकाश अण्णा शेंडगे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून मांडली.

बैठकिचे प्रास्तविक प्रा.रमेश पिसे यांनी केले. याप्रसंगी पियुष आकरे, विलास शेवाळे, आशीर्वाद फाउंडेशनचे जालिंदर मेश्राम, मदन नागपुरे, हरिकिशन हटवार, गणेशराव पावडे, रामदास माहुरे, संजय रामटेके, रफिक शेख, शेख युसुफ, डॉ.अनिल नागबोध, राजेश श्रीच्या, राजेश बेले, गोपाल आडे, भगवान ननावरे, एम.पी.आखरे, रवी रणदीप, वशिष्ट खोब्रागडे, कैलास भेलावे, प्रेमलाल साठवणे, प्रवीण पेटकर, संतोष खोब्रागडे, विनोद नंदुरकर, ज्ञानेश्वर वंजारी, अरुण गाडी, रवी पोथारे, अजय कांबले, एस.एम.देशपांडे, राकेश भुजाडे,आकाश बिहारीसह ओबीसी बांधव उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??