शिक्षक जैपाल ठाकूर यांच्या ‘आजची प्रश्नमंजूषा खंड – २’ या पुस्तकाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुंगानंथम यांचे हस्ते प्रकाशन….
गोंदिया, (दि. 28): आमगाव तालुक्यातील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा सुपलीपार येथील सहायक शिक्षक जैपाल ठाकूर यांनी संग्रहित केलेली ‘आजची प्रश्नमंजूषा’ खंड – २ या पुस्तकाचे प्रकाशन जिल्हा परिषद गोंदियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुरुगानंथम एम. ( भा. प्र. से. ) यांच्या शुभहस्ते तसेच शिक्षणाधिकारी(प्राथ.) सुधीर महामुनी, उपशिक्षणाधिकारी महेन्द्र लांडे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
‘आजची प्रश्नमंजूषा’ हे सदर ३ एप्रिल २०२० पासून अखंडीत सुरू आहे. चालू घडामोडी, राजकीय, इतिहास, भूगोल, गणित इत्यादी बाबींचा समावेश आजची प्रश्नमंजूषामध्ये करण्यात येतो. संपूर्ण महाराष्ट्रात सोशल मीडियाच्या माध्यमातून शिक्षक व विद्यार्थ्यांपर्यंत सदर पोहचवले जाते. सदर खंडात भाग ८०१ ते १६०० ( ४००० प्रश्न ) संग्रहित करण्यात आले आहे.
‘आजची प्रश्नमंजूषा’ खंड – २ च्या प्रकाशनप्रसंगी शोभेलाल ठाकूर, सुनील हरिणखेडे, राजेन्द्र बोपचे, रोहीत हत्तीमारे उपस्थित होते. डायटचे प्राचार्य डॉ. नरेश वैद्य, अधिव्याख्याता पूनम घुले, गटशिक्षणाधिकारी राजकुमार रामटेके, विशाल डोंगरे, विस्तार अधिकारी राजेंद्र येटरे, जे. डी. मेश्राम, केंद्रप्रमुख निशा बोदेले, मुख्याध्यापक मुकेश बारस्कार, अशोक रावते, गट समन्वयक सुनील बोपचे, BRC आर. पी. वशिष्ठ खोब्रागडे व सर्व साधनव्यक्ती, शिक्षक अश्विन भालाधरे, संजय धुर्वे, केंद्रातील सर्व शिक्षक व मित्र परिवार यांनी जैपाल ठाकूर यांचे अभिनंदन केले आहे.