आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्न निकाली काढणार.. जिला परिषद उपाध्यक्ष इंजि. यशवंत गणवीर
■◆ एल.यु. खोब्रागडे यांच्या नेतृत्वात आरोग्य सेविकेचा शिष्टमंडळाने आरोग्य अधिकारी व पदाधिकारी यांची घेतली भेट
गोंदिया, (दि. 24): आरोग्य विभागातील आरोग्य सेविका व इतर कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न जिल्हा परिषद व PHC स्तरावर प्रलंबित आहेत. या पूर्वी आरोग्य सेविकांनी याबाबत अनेक निवेदने जिल्हा परिषद ला दिले पण कुणीही त्या समस्या सोडविले नाही. करीता आज महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व अधिकारी संघटनेच्या माध्यमातुन जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंजि. यशवंत गणवीर यांच्या कडे जिल्हाध्यक्ष एल यू खोब्रागडे यांच्या नेतृत्वात आरोग्य सेविका यांचा शिष्टमंडळ जाऊन प्रलंबित प्रकरणावर सविस्तर चर्चा केली व निवेदन दिले.
उपाध्यक्ष यशवंत गणवीर यांनी सर्व समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. तसेच आरोग्य अधिकारी डाॅ. अरविंद वाघमारे यांच्याशी भेट घेऊन विविध प्रलंबित प्रकरणावर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यामध्ये सातव्या वेतन आयोगाची पाचवी किस्त देणे, श्रीमती ए. के. झाडे कोरंभीटोला यांचे सातव्या वेतन आयोगाची 1 ते 4 हप्त्याची निधी देणे, आरोग्य कर्मचाऱ्यांना नक्षल भत्ता थकबाकी देणे, श्रीमती इंदु उके व ए के झाडे यांना कालबद्ध पदोन्नती चा लाभ देणे, सेवानिवृत्त आरोग्य कर्मचार्यांना एकस्तर वेतन श्रेणी चा लाभ देणे, उपदान मधून कपात केलेली संगणक वसुली रक्कम परत करणे, श्रीमती वीणा ठाकुर यांचा ट्रांसफर (T. A.) बिल काढणे, श्रीमती ए के झाडे आरोग्य सेविका कोरंभीटोला यांच्या सहाव्या वेतन आयोगाचा फिक्शेसन करणे या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. सर्व प्रश्न लवकर निकाली काढण्यात येईल असे आरोग्य अधिकारी यांनी संघटनेच्या शिष्टमंडळाला दिले आहे.
या वेळी महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व अधिकारी संघटना जिला गोंदिया चे जिल्हाध्यक्ष एल यू खोब्रागडे, आर आर अगडे, आरोग्य विभागाचे वरिष्ट सहायक श्री लिल्हारे, मेश्राम, आरोग्य सेविका इंदु उके, वीणा ठाकुर, प्रमिला लोणारे, गेंदुताई रंगारी, उषा तुरकर, लीलाताई कोल्हे, सरोज वालदे, आय डी बिसेन , ए के झाडे, लोणारे व रंगारी सर उपस्थित होते. सरते शेवटी सर्वानी अधिकारी, पदाधिकारी व संघटनेचे आभार मानले..