बंद असलेली अतिरिक्त घरभाडे भत्ता टॅब पुर्ववत सूरु करण्यासाठी शिक्षक समितीचे पालकमंत्री यांना निवेदन…
गोंदिया, (दि. 17): महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा गोंदियाच्या वतीने गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांना गोंदिया जिल्ह्यातील अतिरिक्त घरभाडे भक्ता संदर्भात बंद झालेले टॅब पुन्हा सुरू करण्याकरिता पुणे शिक्षणं संचानालयन यांना निर्देश देण्यासाठी निवेदन देऊन चर्चा करण्यात आली.
शिक्षणाधिकारी जि. प. गोंदिया यांनी दिनांक 02/8/24 ला शिक्षण संचालक पुणे यांना पत्र पाठवून जिल्हयातील शिक्षणासाठी मार्च 2024 पासुन अतिरीक्त घरभाडे भत्ता ची टॅब शालार्थ वेतन प्रणाली मध्ये बंद कऱण्यात आली असुन पूर्ववत सदर टॅब उपलब्ध करुन देण्यासाठी पत्र लिहून मागणी केली आहे ते पत्र दाखवून पालकमंत्री यांना शिक्षक समिती चे विभागीय अध्यक्ष किशोर डोंगरवार यांनी सविस्तर चर्चा करुन न्यायालयाने दिलेला आदेश पण निदर्शनास आणुन दिला व सदर बंद करण्यात आलेला लाभ सूरु करावा अशी आग्रही मागणी केली.
पालकमंत्री महोदयांनी पुणे येथील शिक्षण संचालक यांच्याशी बोलून गोंदिया जिल्ह्याला बंद केलेली घरभाडे भत्ता टॅब पूर्ववत सुरू करण्यासाठी पत्र पाठवून आपली मागणी पुर्ण करु स्पष्ट आश्र्वासन समिती शिष्टमंडळास दिले आहे.
यावेळी किशोर डोंगरवार विभागीय अध्यक्ष तथा गोंदिया जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष, संदीप मेश्राम सरचिटणीस व राजेंद्र बोपचे संचालक व अमोल पाटील मुंगमोडे उपस्थित होते