पीसीएमसीचे माध्यमिक विद्यालय श्रमिकनगर, निगडी येथे शालेय बालसंसद निवडणुक संपन्न
♦सर्वाधिक मते मिळवणारा विद्यार्थी जावेद अन्सारी मुख्यमंत्रीपदी व उपमुख्यमंत्रीपदी तेजस्विनी मुणगेकर यांची निवड
निगडी, ( 13 ऑगस्ट ) : पीसीएमसीच्या माध्यमिक विद्यालय श्रमिकनगर निगडी येथे शालेय बालसंसद निवडणुक दि.9 ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहा वाजता संपन्न झाली.पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेचे उपशिक्षणाधिकारी व विद्यालयाचे मुख्याध्यापक बी. के. नाडेकर यांचे मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या निवडणुकीत सर्व विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनीही मतदान केले. सर्वाधिक मते मिळवणारा विद्यार्थी जावेद अन्सारी याची मुख्यमंत्रीपदी तर द्वितीय क्रमांकाची मते प्राप्त करणारी विद्यार्थिनी कु. तेजस्विनी मुणगेकर हीची उपमुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली. तक्रार निवारण मंत्री – आदित्य कदम, शिक्षण मंत्री – सुजल राठोड, रोहन नवघडे, संरक्षण, सांस्कृतिक मंत्री – सोनाली गायकवाड, नियोजन मंत्री – रुपाली पाठे, शालेय शिस्त मंत्री – स्वप्नाली झिंजे, आहार मंत्री – कृष्णा जरीपटके, आरोग्य मंत्री – अंजुम सय्यद, प्रतीक्षा कांबळे यांचीही शालेय मंत्रिमंडळात निवड करण्यात आली.
प्लॅन इंडिया व सॅन्डविक अंतर्गत समन्वयक शीतल चिंचोळी यांनी बालसंसद निवडणुक प्रक्रिया उत्तम प्रकारे पार पाडली. नामनिर्देशन, चिन्हासह निवडणुक प्रचार व शेवटी मतदान ही लोकशाही निवडणुक पद्धतीत राबविण्यात येणारी प्रक्रिया शालेय निवडणुकीत राबविण्यात आल्याने लोकशाही शासनपद्धतीत निवडणुक प्रक्रिया कशी राबविली जाते याचे कृतीयुक्त ज्ञान विद्यार्थ्यांना सदर निवडणुकीतून मिळाले.
निवडणुक प्रक्रियेच्या यशस्वीतेसाठी पर्यवेक्षक एस. के. फळे, शिक्षिका व्ही. एस. कराळे, अस्मिता गुरव, शिक्षक पी. आर.शिंदे, ए. डी. महाले, एस. डब्ल्यू. पटेकर, आनंद भीमटे, शशिकांत चव्हाण, डी. एस. वाघ, व्यावसायिक शिक्षण शिक्षक सुरज नेहे, सुजाता मुलाटे, शिक्षकेत्तर कर्मचारी निशा लांडगे, अर्जुन मोटवानी, महेंद्र काळभोर व विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.