आपला जिल्हा

जानेवारी 2019 पासून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचार्‍यांना सातव्या वेतन आयोगाचा पाचवा हप्ता ऑफलाइन पद्धतीने देण्यात यावे- सेवानिवृत्त संघटनेची मागणी.

■◆ तालुका पेन्शन अदालत मध्ये उपस्थित केला मुद्दा..

गोंदिया, (दि.6): शासनाच्या आदेशान्वये सर्व सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना सातव्या वेतन आयोगाचा पाचवा हप्ता माहे जुलै पेड इन ऑगस्ट महिन्यात देण्याचे निर्देश असून गोंदिया जिल्हा परिषद मधून डिसेंबर 2018 पर्यंत सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा पाचवा हप्ता देण्यासाठी निधी वर्ग करण्यात आला. परंतु जानेवारी 2019 पासून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचार्‍यांना पाचवा हप्ता देण्यासाठी जिल्हा परिषदेने निधी वर्ग केला नाही. करीता गोंदिया पंचायत समिति च्या तालुका पेन्शन अदालत मध्ये जिल्हाध्यक्ष खोब्रागडे यांनी मुद्दा उपस्थित करून आज पर्यंत च्या सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना पाचवा हप्ता देण्यासाठी निधीची मागणी करावी व सर्वाना ऑफ लाइन पद्धति ने पाचवा हप्ता देण्यात यावा असी मागणी सेवानिवृत्त संघटनेच्या माध्यमातुन पेन्शन अदालत मध्ये करण्यात आली. तसा ठराव घेऊन शिक्षणाधिकारी साहेबाना विनंती करण्यास सांगितले. वयोवृद्ध लोकांना त्रास होता कामा नये या कडे लक्ष द्यावे ही मागणी ठेवण्यात आली.

तसेच जुलै महिन्याचा पेंशन देणे, कोर्टात गेलेल्या 33 लोकांना संगणक राशी देणे, उपदान व अंशराशी करण ची रक्कम देणे, 80 वर्षा पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना 20 % वेतन वाढ लागू करने, सेवानिवृत्तीला 10 वर्षा 8 महीने पूर्ण होताच अंशराशी करण कपात बंद करने, निधी करिता पंचायत समिति ने मागणी करने व वैयक्तिक विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली ते सोडविण्याचे आश्वासन देण्यात आले.
शासनाच्या आदेशान्वये दर महिन्याचा पहिल्या मंगलवार ला खंड विकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पेंशन अदालत घेण्याच निर्देश आहेत. परंतु सभा सुरु होण्यापूर्वी खंड विकास अधिकारी आदरणीय पिंगळे साहेबानी अति तातडीची सभा असल्यामुळे समान्य प्रशासन विभागाचे मंजू चौधरी यांना सांगून गट शिक्षणाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यास सांगितले, परंतु सभेत कोणतेही अधिकारी उपस्थित न झाल्यामुळे समान्य प्रशासन विभागाचे मंजू चौधरी, ठाकरे, शिक्षण विभागाचे गौरकर , कोवे, अर्थ विभागाचे गजभिये, आरोग्य विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत पेन्शन अदालत घेण्यात आली.

 

 

यावेळी सेवानिवृत्त संघटनेचे एल यू खोब्रागडे, डी एल गुप्ता, जी. एम खान, वाय एस तागडे, ओ. के बन्सोड, डी जी बिसेन, सी. पी बिसेन, डी. एम दखने, सुरेश आष्टीकर, नरेंद्र कुरंजेकर, जी बी बोपचे, सुरेंद्र पारधी, एम आर बोपचे, बाचकवार, नांदगाये, बोहने, , गीता दोनोडे, राजकुमारी श्रीवास्तव, श्यामकुवर, मेश्राम व बहुसंख्य सेवानिवृत्त कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??