पिंपरी – चिंचवड मनपाचे माध्यमिक विद्यालय निगडी ( श्रमिकनगर ) येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी कार्यक्रम संपन्न
प्रतिनिधी / 1 ऑगस्ट
निगडी ( पुणे ) : पिंपरी – चिंचवड मनपाचे माध्यमिक विद्यालय निगडी ( श्रमिकनगर ) येथे 1 ऑगस्ट गुरुवारला सकाळी दहा वाजता लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक टिळक पुण्यतिथीचा संयुक्त कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पिं. चिं. मनपाचे प्रभारी उपशिक्षणाधिकारी व माध्यमिक विद्यालय निगडीचे मुख्याध्यापक बी. के. नाडेकर, प्रमुख अतिथी म्हणून पर्यवेक्षक एस. के. फळे, सहायक शिक्षक, पी. आर.शिंदे, ए. डी. महाले, एस. डब्ल्यू. पटेकर, शिक्षिका व्ही. एस. कराळे उपस्थित होते.
लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्यावर अध्यक्षीय मार्गदर्शनातून बी. के. नाडेकर यांनी प्रकाश टाकला. इयत्ता नववीची विद्यार्थीनी उज्वला अहिरेने गीत गायिले व मानसी कांबळे या विद्यार्थिनीने भाषण दिले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माध्यमिक विद्यालय निगडीचे शिक्षक डी. एस. वाघ, आनंद भीमटे, शशिकांत चव्हाण, व्यावसायिक शिक्षण शिक्षक सुरज नेहे, शिक्षकेत्तर कर्मचारी निशा लांडगे, अर्जुन मोटवानी, महेंद्र काळभोर, व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.