श्रावणी मेळावा व शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम 11 ऑगस्ट ला….
गोंदिया, (दि.21):- ‘श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे’ या कवितेच्या ओळींमधून श्रावण महिन्यातील निसर्गाचे सुंदर रूप वर्णिले आहे. या महिन्यात सर्वत्र हिरवळ असून आनंददायी व आल्हाददायक वातावरण असते. अशा आनंददायी वातावरणात जैन कलार समाजातील वैवाहिक महिलांसाठी श्रावणी मेळावा व वर्ग पाचवी ते दहावी मध्ये शिक्षण घेणाऱ्या गोंदिया जिल्ह्यातील समाजातील मुलां मुलीना शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम 11 ऑगस्ट ला घेण्याचे ठराव (20 जुलै) समाजाचे कार्यकारिणी सभेत घेण्यात आले.
समाजाचे जिल्हाध्यक्ष एल. यू. खोब्रागडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सभेला मार्गदर्शक म्हणून उपाध्यक्ष शोभेलाल दहिकर, कोषाध्यक्ष तेजराज मोरघडे उपस्थित होते.
श्रावणी मेळाव्यात समाजातील महिला मंडळींना हिरीरीने भाग घेण्या करीता आवाहन करण्याचे काम महिला कार्यकारिणी कडे सोपविण्यात आले. त्यामध्ये वन मिनट गेम, सामुहिक व एकल नृत्य, फॅशन शो, श्रावणी ब्यूटी क्वीन हे कार्यक्रम होणार आहेत. तरी समाजातील महिलांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन मनसोक्त आनंद लुटावा असेही आवाहन समाज कार्यकारिणीकडून करण्यात येत आहे.
तसेच सभेत विविध विषयावरदेखील चर्चा करण्यात आली. ज्यामध्ये अर्धवट असलेला शौचालय बांधकाम पूर्ण करण्याची माहीती व इतर केलेल्या कामाची माहीती देणे, समाज भवनाच्या आतील भागात लाॅन तयार करणे, समाज भवनाच्या बांधकाम करिता मध्यवर्ती मंडळ नागपूर कडून निधी ची मागणी करणे यावर चर्चा करून ठराव मंजूर करण्यात आले.
या सभेचे औचित्य साधून नुकतेच शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून पदोन्नती झालेल्या समाज कार्यकारिणीचे संचालक डी. टी. कावळे यांचे स्वागत करण्यात आले. सभेत समाज कार्यकारिणी चे पदाधिकारी सुखराम हरडे, यशोधरा सोनवणे, उमेश भांडारकर, वरुण खंगार, अतुल खोब्रागडे, नामदेव सोनवणे, डी.टी. कावळे, मनोज भांडारकर, मनोज किरणापूरे, गोपाल हजारे, वासु सोनवाने, राजकुमार पेशने, विजय सोनवाने, वीणा ताई सोनवाने, मनिषा हरडे, प्राजक्ता रणदिवे, कविता हलमारे, अर्चना सोनवाने, सुमन तिडके, गीता दहीकर आदी उपस्थित होते.