मंडल यात्रेचा समारोप होणार गोंदियात; प्रसिध्द विचारवंत प्रा. लक्ष्मण यादव यांची उपस्थिती
■◆ यात्रेच्या नियोजन सदर्भात विश्रामगृहात पार पडली पहिली बैठक दुसरी 17 जुलै ला..
गोंदिया, (दि. 15): दरवर्षीप्रमाणे नागपूर येथून निघत असलेल्या मंडल यात्रेचा समारोपाचा मान यावेळी गोंदिया जिल्ह्याला मिळाला आहे. त्या निमित्ताने येत्या ७ आॅगस्ट २०२४ रोजी मंडल यात्रा समारोप कार्यक्रमाला मुख्य वक्ते म्हणून ओबीसी बहुजन विचारवंत प्रा. लक्ष्मण यादव (दिल्ली) हे गोंदियाला येत आहेत. त्या कार्यक्रमाच्या आयोजन निमित्ताने शनिवारला येथील विश्रामगृहात ओबीसी संघटना पदाधिकारी यांची बैठक पार पडली.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी ओबीसी अधिकार मंचचे संयोजक खेमेंद्र कटरे होते. या बैठकीत मंडल यात्रेच्या गोंदिया जिल्ह्यातील मार्ग आणि कार्यक्रमाची रुपरेषा यावर चर्चा करुन प्रा.यादव यांचे विचार ऐकण्याकरीता ओबीसी, एसस्सी, एसटी समाजबांधवासंंह ओबीसी विद्यार्थ्यांना कार्यक्रमात कशा पध्दतीने आणता येईल यावर चर्चा करण्यात आली. तसेच ओबीसी विद्यार्थी विद्यार्थीनीकरीता वसतिगृह प्रवेशाकरीता अर्ज प्रकिया सुरु झाल्याने ही माहिती सर्वापर्यंत पोचविण्यावर चर्चा करण्यात येऊन मंडल यात्रेचा समारोप यशस्वी करण्याचे ठरविण्यात आले. कार्यक्रमाच्या खर्चाचेही नियोजन करण्यावर चर्चा करण्यात आली.
या बैठकीला ओबीसी अधिकार मंचचे सयोंजक खेमेंद्र कटरे, अशोक लंजे, कैलाश भेलावे, उमेंद्र कटरे, जि.प.सभापती संजय टेंभरे, ओबीसी संंघर्ष समितीचे राजीव ठकरेले, सुनिल पटले, गौरव बिसेन, राजेश नागरीकर, ओबीसी सेवा संंघाचे भुमेश्वर ठाकरे, सी.पी.बिसेन, प्रमोदकुमार बघेले, भारतीय पिछडा शोषित संघटनेचे प्रेम साठवणे, संंविधान मैत्री संंघाचे अतुल सतदेवे, वशिष्ट खोब्रागडे, बाबा बिसेन, निशिकांत बंसोड़, प्रतीक पारधी, प्रमोद कोसरकर, बालू कोसरकर, श्री.कापगते यांच्यासह सर्व ओबीसी बहुजन संंघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते.
दुसरी बैठक बुधवार (17 जुलै) ला…
मंडल यात्रेच्या समारोप कार्यक्रम पत्रिका, कार्यक्रम निधी व इतर नियोजन संदर्भात येत्या बुधवार १७ जुलै रोजी दुपारी १२:०० वाजता शासकीय विश्राम गृह गोंदिया येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व ओबीसी, बहुजन समविचारी संघटना प्रमुख, पदाधिकारी व बांधवानी उपस्थित रहावे असे विनंतीवजा आवाहन ओबीसी अधिकार मंचचे संयोजक खेमेंद्र कटरे यांनी केले आहे.
कौण है प्रो. डॉ. लक्ष्मण यादव??
डॉ. लक्ष्मण यादव दिल्ली विश्वविद्यालय के ज़ाकिर हुसैन कॉलेज में बीते 14 सालों से हिंदी विभाग में एडहॉक असिस्टेंट प्रोफेसर थे। वे पिछडा (SC, ST, OBC) वर्ग के विचारवंत माने जाते है, इसलिये डॉ. लक्ष्मण यादव को कॉलेज से निकाल दिया गया है। सोशल मीडिया से लेकर यूट्यूब पर एडहॉक असिस्टेंट प्रोफेसर डॉ. लक्ष्मण यादव को फॉलो करने वालों की लंबी लिस्ट है. ऐसे में कॉलेज के छात्र उनके समर्थन में उतर आए हैं.
ऐसें महान विचारवंत गोंदिया मे आ रहे है, आइये उनके विचार सूनने के लिये गोंदिया मे 7 अगस्त को।।