चुकीच्या खाते क्रमांकामुळे थकबाकी पासून वंचित राहिलेल्या व पीवळा फार्म भरलेल्याना मिळणार राशी- जनार्धन खोटरे, मुख्य लेखा वित्त अधिकारी.
■◆ शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्या खात्यावर जमा झाली रक्कम...
गोंदिया, (दि. 28): जिल्हा परिषद गोंदिया अंतर्गत सर्व पंचायत समिति मधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सातवां वेतन आयोगा चे चार हफ्ते, डी.ए. थकबाकी, नक्षल भत्ता व ईतर देयके प्राप्त झाले. परंतु काही सेवानिवृत्त शिक्षकांच्या कार्यवाही मध्ये खाते क्रमांक चुकीचे होते, काही लोकांचे वारसदार ची माहिती बराबर नव्हती, खाते ला के वाय सी जोड़ली नव्हते, असे सेवानिवृत्त कर्मचारी जानी पिवळा फार्म भरून दिला अशा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पैसे कधी मिळणार या साठी अनेक सेवानिवृत्त शिक्षकांनी संघटने कडे तक्रार केली होती. या विषयासंदर्भात मुख्य लेखा वित्त अधिकारी श्री जनार्दन खोटरे यांचेशी चर्चा केली असता जिल्ह्यात असे 36 सेवानिवृत्त कर्मचारी असून त्यांच्यासाठी 60 लाखा चे चेक शिक्षणाधिकारी प्राथमिक यांना दिले असल्याची माहिती मिळाली.
सदर रक्कम शिक्षणाधिकारी यांच्या खात्यावर जमा झाली आहे. ते लवकर मिळणार आहेत. यासाठी संघटनेच्या कार्यात यश आले. संघटनेच्या वतीने मुख्य वित्त व लेखा अधिकारी यांचे पुष्पगुच्छ देऊन संघटनेने आभार मानले.
या प्रसंगी महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व अधिकारी संघटना चे जिल्हाध्यक्ष एल यू खोब्रागडे, उपाध्यक्ष टी बी. भांडारकर, राज्य प्रतिनिधी पी आर पारधी, मार्गदर्शक आर आर अगडे, मनुताई उके, रेखा बोरकर, जिओंकार कराडे , तुरकर, सी बी पाछोडे, सुरेश आष्टीकर, रहांगडाले उपस्थित होते.