दुचाकी अपघातात सेवानिवृत्त शिक्षक जागीच ठार…
★■ बाबासाहेबाच्या चळवळीतील अभ्यासू, लढवय्या खंदा कार्यकर्ता हरवला.
हिंगणघाट, (दि. 12): समाज सेवी, संवेदनशील व्यक्तीमत्व असलेले बाबा साहेबांच्या चळवळीत निष्ठेने कार्य करणारे सेवानिवृत्त शिक्षक प्रतिक गायकवाड यांचे दुचाकीने खेड्याकडून हिंगणघाट ला घराककडे येत असतांना आकस्मिक दुर्घटनेत काल(दि.11) रात्री दि.९:०० च्या सुमारास निधन झाले. त्यामुळे हिंगणघाट परिसरात शोक व्यक्त केला जात आहे.
प्रतिक गायकवाड हे एक वर्षापूर्वीच इंदिरा गांधी हायस्कूल हिंगणघाट येथून सहायक शिक्षक पदावरून सेवावृत्त झाले होते. नौकरी सांभाळून सामाजिक चळवळीत कृतिशील राहिले आणि सेवानिवृत्तीनंतरही सक्रिय कार्यकर्ता म्हणून त्यांनी बाबासाहेबांच्या चळवळीला पुढे नेण्यासाठी तन मन धनाने मोलाचे योगदान दिले हे समाज कधिही विसरणार नाही.
त्या उपरांत त्यांची पत्नी आणि दोन मुले आहेत त्यांच्यावर व त्यांच्या कुटुंबावर हा एक आघातच आहे. त्यांच्या आप्त परीवारावर आकस्मिक कोसळलेल्या संकटात आम्ही सोबत आहोत. अशी श्रद्धांजली शिक्षक आनंद साखरे व मित्र परिवार यांनी व्यक्त केली आहे.