कृषी व व्यापार

घोडाझरी येथे मत्स्य व्यवसायिकांचे एक दिवसीय प्रशिक्षण संपन्न

♦ ढिवर समाजातर्फे डॉ. सतिश वारजूकर यांचा शाल व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार

 

नागभीड, ( 2 मार्च ) : तालुक्यातील पर्यटन स्थळ घोडाझरी येथे घोडाझरी आधुनिक मत्स्यव्यवसाय संस्था नागभिडद्वारा आयोजीत ‘ आधुनिक मत्स्यव्यवसाय : एक दिवसीय प्रशिक्षण, मच्छीमार संस्थेचा सत्कार, समाज गौरव पुरस्कार’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उदघाट्न राष्ट्रीय उपाध्यक्ष ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश तथा समन्वयक चिमूर विधानसभा डॉ. सतिश वारजुकर यांच्या हस्ते संपन्न झाले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संचालक, राष्ट्रीय मत्स्यजीवी सहकारी संघ (फिशकॉपड) तथा (माजी) कार्यकारी संचालक, महाराष्ट्र राज्य मच्छीमार सहकारी संघ डॉ. प्रकाश लोणारे, कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून सदस्य, भुजलायशीन मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था व संघ नोंदणी समिती (महा. राज्य) डॉ. दिलीप शिवरकर, संयोजक ग्रामविश्व संघर्ष वाहिनी, कांग्रेस नेते विनोद बोरकर, संचालक जिल्हा मच्छीमार संघ चंद्रपूर, विजय नान्हे, प्रा. शरद गिरडे ,केवळ साहेब, देविदास मेश्राम माजी गटशिक्षणाधिकारी, सदाशिव मेश्राम प्राचार्य ग्रामदर्शन कनिष्ठ महाविद्यालय खडसंगी, विलास मोहिणकर वाल्मिकी मच्छीमार संस्था उपाध्यक्ष चिमूर, मनिष नाईक, ट्री फाउंडेशन , ज्ञानेश्वर शिरभैये, अलोक कांबळे, अक्वाकल्चर कन्सल्टंट उपस्थित होते.

 

उपस्थित समाज बांधवाना डॉ. सतिश वारजुकर यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, मासेमारी पूर्वी मर्यादित होती. परंतु आजच्या काळात मत्स्यपालन व्यवसाय हा एक यशस्वी, प्रतिष्ठित आणि लघु उद्योग म्हणून प्रस्थापित होत आहे. माशांमध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असल्याने केवळ भारतातच नव्हे तर जगभरात त्याची मागणी खूप जास्त आहे. एक काळ असा होता की, नद्या आणि तलावात मासे मिळायचे. पण आजच्या काळात माशांसाठी शास्त्रोक्त पद्धतीने कृत्रिम जलाशय बनवले जात आहेत. ज्या ठिकाणी नदी आणि तलावात कोणते मासे येतात त्या सर्व सुविधा दिल्या जात आहेत. मासळीची वाढती मागणी पाहता सध्याच्या काळात मत्स्यपालन व्यवसाय सुरू करून खूप चांगला नफा मिळवता येतो. तुम्हालाही तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरु करून नफा मिळवायचा आहे, तर तुम्ही मत्स्यपालन व्यवसायाकडे पाहू शकता. मासेमारी व्यवसाय तुमच्यासाठी खूप फायदेशीर व्यवसाय बनू शकतो.

 

या कार्यक्रमाचे आयोजन मुख्य व्यवस्थापक घोडाझरी आधुनिक मस्त्यव्यवसाय संस्था नागभीड विजय डाबरे यांनी केले. संचालन कांग्रेस नेते विवेक कापसे यांनी केले. ढिवर समाजातर्फे डॉ. सतिश वारजूकर यांचे शाल व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??