स्वाधार योजना अर्जासाठी 15 मार्चपर्यंत मुदतवाढ
नागपूर, दि. 29 – डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय स्वाधार योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मागासवर्गीय शासकीय वसतिगृहातील मुला-मुलीं प्रमाणे भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता व इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी निर्धारीत रक्कम लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर थेट जमा केली जाते. 2023-24 या आर्थिक वर्षातील स्वाधार योजनेचा लाभ मिळण्याकरीता www.swadharyojana.com या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने अर्ज करता येतील. योजनेतंर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांना 15 मार्चपर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.
ऑनलाईन पध्दतीने अर्ज करुन या अर्जाची प्रत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नागपूर येथे सादर करण्यात यावी, असे आवाहन समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, नागपूर येथे संपर्क साधावा.