नमो चषक कबड्डी स्पर्धा : पुरुष गटातून भंडारा संघाने तर महिला गटातून नागपूर संघाने पटकाविले प्रथम बक्षीस
♦ माजी आमदार मितेश भांगडिया यांच्या हस्ते नमो चषक 2024 – कबड्डी स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न
भिसी, ( 25 फेब्रुवारी ) : भारतीय जनता पार्टी व भाजपा युवा मोर्चा शाखा भिसीच्या वतीने श्री विठ्ठल रुखमाई देवस्थान भिसीच्या मैदानावर दि. 20, 21 व 22 फेब्रुवारीला आयोजित विदर्भ राज्यस्तरीय नमो चषक 2024 – कबड्डी स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा 22 फेब्रुवारीला रात्री दहा वाजता माजी आमदार मितेश भांगडिया यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या स्पर्धेत विदर्भातील पुरुषांचे 16 संघ व महिलांचे 9 संघ सहभागी झाले होते. कबड्डी स्पर्धेत पुरुष गटात भंडारा संघाने 51 हजार रुपयांचे तर महिला गटात मराठा लांसर्स महाल, नागपूर संघाने 41 हजार रुपयांचे प्रथम बक्षीस पटकाविले.भद्रावती संघाने ( जि. चंद्रपूर ) पुरुष गटातून द्वितीय क्रमांक तर महिला गटातून श्री गजानन क्रीडा मंडळ नागपूर संघाने द्वितीय पारितोषिक मिळविले.
पुरुष गटातून उत्कृष्ठ रेडर अखिल वाघाये, महिला गटातून उत्कृष्ट रेडर – साक्षी त्रिपाठी ( मराठा लाँसर्स, महाल नागपूर ) यांनी पारितोषिक मिळविले. मॅन ऑफ द सिरीजचा बहुमान राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू आकाश पिकलमुंडे ( भंडारा संघ ), महिला संघातून मॅन ऑफ द सिरीजचा बहुमान मंगला ढबाले ( श्री गजानन क्रीडा मंडळ नागपूर ) यांनी पटकाविला.
पुरुष गटातून अंतिम सामन्यातील मॅन ऑफ द मॅच पुरस्कार भद्रावती संघाच्या कुणाल रासेकर, महिला संघातून मॅन ऑफ द मॅच पुरस्कार आकांक्षा जोशी ( श्री गजानन क्रीडा मंडळ नागपूर ) यांना मिळाला. उत्कृष्ठ डिफेन्डर पुरुष संघ – गौरव रामेडवार ( भद्रावती संघ ), महिला संघातून क्षितिजा साखरकर यांना मिळाला.
बक्षीस वितरण सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून भाजपाचे ज्येष्ठ नेते डॉ. दिपक यावले, बाबुराव बोम्मेवार, गोपाल बलदुवा, घनश्याम डुकरे, गरीबा निमजे, कृष्णाजी तेजने, विलास डांगे, सुनील खवसे, प्रशांत खरडभाजने, माजी भाजयुमो तालुकाध्यक्ष किशोर मुंगले, नत्थू गेडाम उपस्थित होते. कबड्डी सामन्यांच्या यशस्वितेसाठी भाजपा शहर अध्यक्ष पंकज गाडीवार, भाजपा जि. प. सर्कल प्रमुख निलेश गभने, लीलाधर बन्सोड, राजू बानकर, रवी लोहकरे, हर्षल डुकरे, किशोर नेरलवार, विनोद खवसे, महेश खवसे, अतूल पडोळे, पंकज निमजे, मनोज अहेर, विलास दिघोरे, अमोल बेलखोडे, बंडु तुंबेकर, धनंजय सहारे, अनिल नागपूरे, संदीप बानकर, यशवंत भुजाडे, अरूण गोहणे, अरूण शिवरकर, ताराचंद दिघोरे, हर्षल कुमले, मंजुषा ठोंबरे, दिपाली बानकर, भारतीय जनता पार्टी शाखा भिसी व भा.ज.पा. युवा मोर्चा शाखा भिसीच्या सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.
विजेत्या खेळाडूंना मितेश भांगडिया यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह, पुष्पगुच्छ व रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला.भिसी व परिसरातील हजारो क्रीडाप्रेमिंनी 20, 21 व 22 फेब्रुवारीला कबड्डी स्पर्धेचा आनंद लुटला.