आ. कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांच्या उपस्थितीत ढिवर समाज व आदिवासी समाजातील अनेकांचा भाजपात प्रवेश
चिमूर, ( 15 फेब्रुवारी ) : आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांच्या प्रमुख उपस्थितीत चिमूर येथील निवासस्थानी तालुक्यातील मच्छिंद्र मच्छीपालन सह. संस्था मर्या. नवतळा चे अध्यक्ष गुणवंत शिवरकर, सचिव जितेंद्र शिवरकर तथा सर्व सदस्यगण आणि आदिवासी गोंड / परधान समाज महिला मंडळ सिरपूर च्या अध्यक्षा सुनीता कुमरे, सचिव अर्चना सयाम तथा सर्व सदस्यगण व दोन्ही समाजातील दोनशे पेक्षा अधिक बंधू-भगिनींनी भाजपात प्रवेश केला.
यावेळी बंटीभाऊंनी सर्वांच्या गळ्यात भाजपाचा दुपट्टा टाकून पक्षात सहर्ष स्वागत केले व पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष राजू पाटील झाडे, भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष राजू पाटील देवतळे, भाजयुमो प्रदेश सचिव मनिष तुंम्पल्लीवार, भाजपा तालुका महामंत्री प्रशांत चिडे, भाजपा ज्येष्ठ नेते भिमराव ठावरी, भाजपा ज्येष्ठ नेते प्रकाश वाकडे, भाजपा ज्येष्ठ नेते अशोक कामडी, भाजपा ज्येष्ठ नेते घनश्याम डुकरे, भाजपा युवा नेते समीर राचलवार, सं.गां.नि.अ.यो. समिती अध्यक्ष संजय नवघडे, भाजपा शहराध्यक्ष सचिन फरकाडे, भाजयुमो तालुकाध्यक्ष श्रीरंग (बालू) पिसे, भाजयुमो शहराध्यक्ष बंटी वनकर, भाजपा तालुका उपाध्यक्ष महादेव कोकोडे, भाजपा महिला आघाडी तालुकाध्यक्षा माया नन्नावरे, भाजपा ओबीसी आघाडी तालुकाध्यक्ष एकनाथ थुटे, भाजपा अनुसूचित जमाती आघाडी तालुकाध्यक्ष गजानन गुडधे, भाजपा मच्छीमार सेल तालुकाध्यक्ष दिवाकर डहारे, भाजपा सिरपूर पं. स. सर्कल प्रमुख विलास कोराम, भाजपा पदाधिकारी तथा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.