शेतकरी, महिला, बेरोजगार युवकांच्या प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेसने ( शरद पवार गट ) अप्पर तहसीलदारांना दिले निवेदन
भिसी, ( 1 फेब्रुवारी ) : आज गुरुवार दि. 1 फेब्रुवारी ) ला अप्पर तहसील कार्यालय भिसी येथे खासदार रोहित पवार यांचे आदेशानुसार राष्ट्रवादी काँग्रेसने ( शरद पवार गट ) चे जिल्हा उपाध्यक्ष श्रीनिवास शेरकी, भिसी शहर अध्यक्ष किशोर गभणे यांच्या नेतृत्वात शेतकरी, महिला, बेरोजगार युवकांच्या व प्रश्नांवर निवेदन देण्यात आले.
या निवेदनात युवा विद्यार्थ्यांच्या समस्या, शेतकरी, बेरोजगारी, महिला सुरक्षा, कामगार, अंगणवाडी सेविका, शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नाही, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीक विम्याचे हप्ते मिळत नाही, नोकरभरतीसाठी हजारो रु. शुल्क आकारून पेपर फुटी होते, या मुद्द्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी निवेदन देण्यात आले.
यावेळी रा. कॉ. चे कार्यकर्ते हनुमंत गेडाम ( जेष्ठ नागरिक अध्यक्ष ), अमृत बनसोड, राजू भीमटे, अहमद शेख,नरड, नरेश कडवे, गरमडे साहेब, विजय मातणे, राजू कुमले,अनिल शेंडे, अरविंद भुजाडे, दिनेश दिघोरे, खटुजी दिघोरे, पिंटू नागोसे, दुर्वास भुजाडे, हरिदास जांभुळे, रामचंद्र दिघोरे रवींद्र गोंगले, प्रकाश मेश्राम, शांताराम नान्हे, प्रभाकर बोरकर,मनोहर वानखेडे, खटुजी रंदई, दिगंबर खोब्रागडे, मारोती दोडके, काकाजी नागपुरे, संतोष मुरकुटे, विलास आस्टनकर, दुर्वास कांबळी, सुमित कांबळे, मनोज दिघोरे, राहुल दिघोरे उपस्थित होते.