पक्ष निरीक्षक शेखर सावरबांधे यांनी घेतली चंद्रपूर शहर राष्ट्रवादी पक्षाची आढावा बैठक
चंद्रपूर, ( 21 ऑक्टोबर ) : शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बैठक पक्षाचे चंद्रपूर शहरासाठीचे राष्ट्रवादीचे पक्ष निरीक्षक नागपूरचे माजी महापौर शेखर सावरबांधे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. या बैठकीला चंद्रपूर शहराचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष दीपक जयस्वाल, शहराचे कार्याध्यक्ष सुधाकर कातकर,चंद्रपूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, शहराचे युवक अध्यक्ष कलाकार मलारप, प्रदेश सरचिटणीस हिराचंद बोरकुटे, महीला जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके, नगरसेविका मंगला आखरे, विनोद लाभने, युवती अध्यक्ष रितिका चौधरी,शहर महीला अध्यक्ष नंदाताई शेरकी, राजेंद्र आखरे,चंद्रकांत अग्रवाल, माणिकराव लोणकर, राहुल देवतळे, ऍड. निमेश मानकर, सूरज चव्हाण, वंदना आवळे, हरिनाथ यादव, दशरथ मिट्ठावार, आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. मोठ्या संख्येने शहरातील वार्डा-वार्डातून कार्यकर्ते उपस्थित होते.
याप्रसंगी अनेक युवा कार्यकर्त्यांनी आणि युवतींनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. राहुल देवतळे यांची चंद्रपूर शहर उपाध्यक्ष पदावर नियुक्ती शेखर सावरबांधे यांच्या हस्ते पत्र देवून करण्यात आली.