क्राईम न्युज
भीषण अपघात: भरधाव टिप्पर च्या धडकेत दोन महिला जागीच ठार, एक गंभीर जखमी
आमगांव (दि. 28): आमगाव- गोंदिया राज्य महामार्गावर गोरठा गावा नजीक ट्रक टिप्पर ने (MH 35 A 1021) दुचाकी वाहनाला (MH 35M 7565) धड़क दिल्याने दोन महिला जागीच ठार झाल्या तर दुचाकी वाहन चालक गम्भीर जख्मी झाला असून त्याला गोंदिया के. टी. एस रुग्णालयात हलवण्यात आले. सदर घटना आज बुधवार दि. 28 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 1.30 वाजे दरम्यान घडली आहे.
उपरोक्त घटनेबाबद सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार मृतकांचे नाव सत्यशिला ब्रिजलाल बिसेन (36) व सुनीता सुरजलाल बिसेन (40) असून दुचाकी वाहन चालक दीपक ब्रिजलाल बिसेन (23) रा. पोकेटोला ( टेकरी) येथील रहिवासी असून ग्राम ठाणा येथे मृतक आपल्या मुलीच्या घरचे कार्यक्रम आटोपून गंभीर दीपक ब्रिजलाल बिसेन आपल्या आईला व काकूला घेवून गावाकडे जात असताना हा भीषण अपघात झाला असल्याचे कळले आहे.